साठवणीतली वारी
राम राम मंडळी !!
आजपासून आषाढी वारीच्या अलौकिक सोहळ्याला सुरुवात होत आहे. आज श्रीसंत तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान, उद्या सद्गुरु श्री ज्ञानोबारायांच्या पालखीचे प्रस्थान.
खरोखरीच अद्भुत आणि विलक्षण असतो हा वारीचा सोहळा. त्याची गोडी सप्रेम अनुभवलेल्या माणसालाच मी काय म्हणतोय ते कळेल, शब्दांत सांगताच येत नाही ते सुख !!
गेल्यावर्षी मी त्या वारीच्या निमित्ताने, लागला टकळा पंढरीचा याशीर्षकाने साठवणीतलीवारी ही लेखमाला लिहायला घेतली खरी, पण फक्त तीनच लेख लिहून झाले. यावर्षी आधी तेच तीन लेख पुन्हा पोस्ट करून मग पुढील लेख जमतील तसे लिहायचा विचार आहे.
शेवटी या वारीबद्दल कितीही लिहिले तरी मन भरणारच नाही माझे, खरंच सांगतोय. आणि सद्गुरुकृपेने प्रचंड अनुभव आलेले आहेत आम्हां सर्वांना या आनंदसोहळ्यात. तेच तुम्हां सर्वांना सांगून, पुन्हा त्यांचा एकत्र आनंद घ्यावा असा विचार आहे. पाहू श्रीभगवंतांची कशी कृपा होते ते. इच्छा तर तीव्र आहेच.
सर्वांना पुनश्च या साठवणीतलीवारी साठी मन:पूर्वक हार्दिक आमंत्रण !!
चला, येताय ना माझ्यासोबत वारीला??
- रोहन विजय उपळेकर

0 comments:
Post a Comment