गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद - ४
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचा १३० वा जयंती उत्सव सुरू झालेला आहे. त्यानिमित्त आपण प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक आणि अद्भुत लीलांचा आस्वाद घेऊया.
४. एक अद्वितीय सिद्धपुरुष
[ प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचा अनेक वर्षे सहवास लाभलेले पुण्यातील एक संस्कृत शिक्षक कै.श्री.रा.बा.कुलकर्णी यांनी पू.काकांवर पूर्वी लिहिलेला एक भावपूर्ण लेख आज पोस्ट करीत आहोत. यातून आपल्याला पू.काकांचे अत्यंत मनोज्ञ दर्शन घडते. श्री.कुलकर्णी यांनी या लेखामध्ये पू.काकांच्या वाङ्मयातील अनेक संदर्भ नेमकेपणे वापरलेले आहेत. पू.काकांनी लिहिलेल्या ' विभूती ' ग्रंथाची लिंक लेखाखाली देत आहोत. जिज्ञासूंनी हा सुरेख ग्रंथ डाऊनलोड करून आवर्जून वाचावा ही विनंती. ]
सिद्ध पुरुषांची परंपरा महाराष्ट्रात अखंड चालू आहे. त्या परंपरेत आपल्या जगावेगळ्या अनोख्या व्यक्तिमत्वाने शेकडो साधकांना, प्रपंचाने गांजलेल्या आर्त सांसारिकांना व जिज्ञासूंना ज्यांनी मार्गदर्शन केले, त्यांची प्रेमाने दखल घेऊन साधनेला लावले त्या सिद्ध पुरुषांमध्ये पू.काका आपल्या वैशिष्ट्याने उठून दिसतात. तसे म्हटले तर फलटण स्थानावर श्रीरामरायाची व प्रसिद्ध योगी श्री हरिबाबांची मूळची कृपा आहेच. त्याच फलटणमध्ये पू.काकांनी साधक व सिद्ध या दोन्ही अवस्थातील आपली हयात घालवली व फलटणला त्यांनी पवित्र क्षेत्राचे स्वरूप आणून दिले.
सुमारे ३५ वर्षांपूर्वी पू.काकांचे मला प्रथम दर्शन झाले. भोर संस्थानच्या राजेसाहेबांच्याबरोबर मी फलटणला पू.काकांच्या दर्शनासाठी गेलो होतो. काका त्यावेळी गावाबाहेर हरिबुवांच्या समाधी मंदिराच्या समोर असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीपुढे देवाकडे पाठ करून मोठमोठ्याने टाळ घेऊन भजन करीत होते. आम्ही त्यांना वंदन केल्यावर मला उद्देशून ते म्हणाले, "काय रे मंगेश, तू इकडे कोणीकडे आलास ?" त्यांनी मला 'मंगेश' या नावाने का हाक मारली याचा उलगडा मला अजूनही झालेला नाही.
पण त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने मी भारावून गेलो. अर्धोन्मीलित दृष्टी, मधुर हास्य व एक विशिष्ट भावावस्थेत चाललेले त्यांचे भजन पाहून हा एक प्राप्तपुरुष आहे असे वाटले व त्या दिवसापासून मी सवड सापडेल तेव्हा फलटणला त्यांच्या दर्शनासाठी जाऊ लागलो.
१९५२ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे चारच्या सुमारास पू.काकांनी स्वप्नात येऊन मला नारळ व पेढे दिले. मी त्यांचा तो अनुग्रह मानला व त्याप्रमाणे त्यांना पत्राने ती हकीकत कळवली.
त्यानंतर पू.काकांची ज्यांच्यावर विशेष कृपा झालेली होती ते श्री.बागोबा महाराज कुकडे माझ्याकडे आले व ज्ञानेश्वरीवर काकांनी केलेल्या 'सुबोधिनी' या तिसऱ्या अध्यायावरील भाष्याची मुद्रणप्रत मी करावी अशी काकांची इच्छा आहे असे सांगितले. त्यानिमित्ताने काकांच्या सन्निध जाण्याची मला संधी प्राप्त झाली व मी त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांपैकीच एक झालो व पू.काकांच्या व्यक्तिमत्वाचे मला जवळून अवलोकन करता आले.
पू.काकांच्याकडे केव्हाही गेले तरी ते मांडीवर ज्ञानेश्वरी घेऊन वाचन करीत, हातातील पेन्सिलने त्यावर खुणा करीत बसलेले दिसायचे. आल्या गेल्याचे स्वागत चहा देऊन व्हायचे, त्यांची प्रेमळ चौकशी करून लहर असेल तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत. संध्याकाळी नियमाने अगोदर फलटणकरांच्या रामाचे दर्शन घेऊन हरिबाबांच्या समाधीच्या दर्शनाला जात. तेथे समाधीसमोर सारखी 'लोटांगणे' घेत. ती लोटांगणे पाहून, पुसेसावळीला कृष्णदेवांच्या भोवती काट्याकुट्यातून, दगडधोंड्यातून अंग रक्तबंबाळ होईपर्यंत काका लोटांगणे घेत असत, असे तेथील लोक सांगत असत त्याची आठवण येई.
समाधी दर्शनानंतर परत येताना पू.काका निवृत्ती मेळवणे नावाच्या त्यांच्या भक्ताच्या घरी हरिपाठ करीत असत. बरीच वर्षे हा प्रघात चालला होता. त्यावेळी काका कधी कधी आपल्या 'सुबोधिनी' मधील काही भाग वाचावयला सांगत व त्याचा आशय समजावून देत. अशा बैठकीत कधी कधी पुण्याचे एक सद्भक्त बॅ. रावसाहेब मेहेंदळे असत. ते कृष्णमूर्तींचे मोठे प्रेमी व चिकित्सक अभ्यासू होते. ते काकांना कृष्णमूर्तींची प्रवचने वाचून दाखवीत व काकाही मोठ्या आस्थेने ती ऐकत. हा परिपाठ पुढे पू.काकांच्या घरी, श्रीगुरुकृपा वास्तूत होऊ लागला.
पू.काकांचे हरिपाठावर विलक्षण प्रेम होते. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना त्यांनी शेकडोनी हरिपाठ दिले. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांत प्रापंचिक आधीव्याधींनी त्रस्त झालेले लोक जास्त येत व लहर असेल त्याप्रमाणे पू.काका त्यांना उपाय सांगत. पुष्कळ वेळा काकांचे बोलणे परोक्ष असे. प्रथम दर्शनी त्याचा उलगडा होत नसे. याचे रहस्य पू.काकांनी आपल्या 'श्रीकृष्णदेव' चरित्रात दिले आहे. "केव्हाही एखादी काळाच्या जबड्यात सापडलेली व्यक्ती किंवा दुःखाने पोळलेली व्यक्ती देवांच्याकडे ( श्रीकृष्णदेव महाराजांकडे ) आली तर ते तिचे दुःख हरत-हेने कमी करत. कारण त्या व्यक्तीच्या पुढील जन्मामधील कोणती तरी भर घालून सध्याच्या काळात त्याची दुरुस्ती होऊ देणे हे त्यांच्या हाती असे. मात्र ते कधीही व केव्हाही स्पष्ट बोलत नसत कारण 'प्रकृतिगत' या न्यायाने त्यांच्या बोलण्याचा अर्थ उलट सुलट मध्ये फिरत राहतो." काकांचेही बोलणे बहुधा असेच असे. 'प्रारब्धकर्मणां भोगादेव क्षय: ।' या न्यायाने प्रारब्ध भोग कोणालाही, संतांना सुद्धा चुकत नाहीत. संत फक्त त्याची adjustment करू शकतात, असे प.पू.काका नेहमी म्हणत असत.
पू.काकांनी आपल्या 'श्रीकृष्णदेव' या ग्रंथात लिहिले आहे, " युगायुगाच्या ठिकाणी महान साधू व्यक्ती उत्पन्न होऊन त्यांनी जगाच्या कल्याणाशिवाय दुसरी कोणतीच उज्ज्वलता व्यक्त केलेली नाही. असे सत्पुरुष म्हणजे त्यांच्या नुसत्या कृपादृष्टी बरोबरच त्या त्या व्यक्तीमधील बंध नाहीसे होऊन 'अनंत समतानंद' त्यास आपल्या कामामध्ये निर्वेध श्रेय प्राप्त झाले पाहिजे , मग त्यांचे काम ऐहिक असो वा आत्मिक असो."
काकांचे बोलणे परोक्ष असे कारण काकांनी मानापमानाचे गोवे गुंडाळून ठेवलेले होते. कोणत्याही गोष्टीचे श्रेय ते आपल्याकडे घेत नसत. 'अलौकिका नोहावे लोकांप्रति' हा माउलीचा दंडक त्यांनी अक्षरश: पाळला. याची एक दोन उदाहरणे देतो, मुंबईचे एक न्यायाधिकारी श्री.मंजेश्वर हे पू.काकांचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी पुसेसावळीला जाऊन काकांच्या साधक दशेबद्दल बरीचशी माहिती गोळा करून 'The Maharshi of Phaltan' म्हणून एक पुस्तिका छापली व तिच्या काही प्रती फलटणला वाटण्यासाठी पू.काकांच्याकडे पाठविल्या. काकांनी त्या सगळ्या प्रती घेऊन पाण्याच्या बंबात जाळून टाकल्या.
मुंबईचे एक भक्त काकांच्याकडे नेहमी येत असत. एका विश्वस्त निधीबद्दल त्यांना एक अडचण आली होती. पू.काकांना त्यांनी ती सांगितली. पू.काका त्यांना म्हणाले, "पुण्याला कुलकर्णी मास्तरांकडे जा व त्यांना घेऊन हरिकृष्ण आश्रमात इंदिरादेवीचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घ्या." मी इंदिरादेवींना संस्कृत शिकवत असे. त्यामुळे त्यांचा माझा परिचय होता. पू.काकांच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना इंदिरादेवींकडे घेऊन गेले व त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. अशी त्यांची लीला करण्याची पद्धत होती. ते स्वत:कडे कसलेच श्रेय घेत नसत. कारण अलौकिक असे अमानित्व त्यांच्याठायी पूर्ण बहरलेले होते.
तसे पाहिले तर, पू.काकांचे सांसारिक जीवन इतरांसारखेच नव्हे तर जास्त हलाखीचे होते. श्रीकृष्णदेवांच्या कृपेने प्राप्तपुरुष झाल्यावर व पुढील काही वर्षे परिभ्रमणावस्थेत घालविल्यावर ते फलटणला आले. तो काळ व नंतरची काही वर्षे त्यांच्या घरी मूर्तिमंत अठराविश्वे दारिद्र्य होते. पण पू.काका स्थितप्रज्ञ असत. " देह तरी वरिचिलीकडे । आपुलियापरी हिंडे । परी बैसका न मोडे । मानसीची ॥" अशा अवस्थेत ते आत्मलीन असत.
आपल्या गतायुष्यातील कोणत्याही गोष्टीचा उल्लेख करण्याचे ते टाळीत. न जाणो त्यात आत्मश्लाघेचा दोष लागेल असे त्यांना वाटे. एकदा प्रसिद्ध साधू मेहेरबाबा त्यांच्या दर्शनास फलटणला आले होते. त्या दोघांमध्ये दारे बंद करून चर्चा झाली होती. मला त्या भेटीबद्दल औत्सुक्य होते, म्हणून पू.काकांना त्याबद्दल मी विचारले. पण त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
समकालीन संत व पू.काका यांच्यामध्ये देवाण घेवाण होत होती. इस्लामपूर नाक्यावर असलेले अवधूत धोंडिबाबा यांच्याकडे काका काही लोकांना पाठवीत. पावसाचे सिद्ध पुरुष स्वरूपानंद यांचे काही शिष्य पू.काकांच्या दर्शनाला येत. स्वामींचा 'नित्यपाठ' त्यांची अनुमती घेऊन काही साधकांना काका देत असत. पुण्याचे सत्पुरुष श्री.गुळवणी महाराज व काका यांचे परस्परांवरील प्रेम दोघांच्याही शिष्यात सर्वज्ञात आहे.
प.पू.श्री.काकांची ग्रंथरचना अपूर्व आहे. 'श्रीकृष्णदेव', श्रीहरिबाबा व आईसाहेब यांचे 'विभूती' चरित्र व विशेषत: श्रीज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायांवरील त्यांचे 'सुबोधिनी'चे अठरा भाग हे साधकांना मार्गदर्शन करण्याकरता त्यांनी केलेले लेखन आहे. त्यात त्यांचे विविध ग्रंथाध्ययन, बहुश्रुतता व श्रेष्ठ दर्जाचा पारमार्थिक अनुभव दिसून येईल. शांकरभाष्य , योगवासिष्ठ, विवेकसिंधू, दासबोध, संस्कृत नाटके इतर संत वाङ्मय यांचा सखोल व्यासंग त्यात दिसून येतो. पुसेसावळी येथे होऊन गेलेल्या, त्रिपुटीच्या गोपाळनाथ परंपरेतील शाहीर हैबतीबाबा यांच्या काव्य संपदेबद्दल काकांना फार प्रेम व आदर वाटत असे व त्यांचे समग्र काव्य प्रसिद्ध व्हावे अशी त्यांची इच्छा होती.
पण पू.काकांच्या जिव्हाळ्याचे खरे स्थान, प्रेमाचा विषय म्हणजे ज्ञानेश्वर माउली व त्यांचे वाङ्मय. पू.काकांच्या जवळ एक जुने ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित होते. त्यातील पाठच त्यांनी 'सुबोधिनी'मध्ये घेतले आहेत. 'अमृतानुभव' हा सिद्धरहाटीचा ग्रंथ म्हणून पू.काकांचा ज्ञानेश्वरीवर फार भर. विशेषत: ज्ञानदेवांच्या विरहिण्या काकांना फार प्रिय. भगवान श्री ज्ञानदेवांच्या काही विरहिण्यांचा गूढार्थ काकांनी 'सुबोधिनी'मध्ये प्रकट केला आहे. 'सुबोधिनी'चे सूक्ष्म वाचन ज्यांनी केले आहे त्यांना ज्ञानेश्वरीमधील सहाव्या अध्यायातील काही गूढ अनुभवात्मक योगपर ओव्यांचे काकांनी केलेले रहस्योद्घाटन विचारांना चालना देणारे वाटेल.
श्री.बागोबा महाराजांना एकदा पू.काका म्हणाले होते, " बागबा, ह्या गोविंदाने माउलींची प्रत्येक ओवी अनुभवलेली आहे." किती मोठा अनुभव ते सहज सांगून जातात पाहा. सद्गुरु माउलींची एक ओवी अनुभवली तरी जीवन धन्य होते, इथे पू.काका प्रत्येक ओवी अनुभवली आहे म्हणून सांगत आहेत. बापरे !!
श्री ज्ञानेश्वर महाराजांना संगीत प्रिय होते व त्या शास्त्रात ते तज्ज्ञ होते, असे पू.काकांचे मत होते म्हणून काही अध्यायातील ओव्या कोणत्या रागदारीत गाव्यात याची माहिती ते देत असत. उदाहरणार्थ दहावा अध्याय 'जयजयवंती' व तेराव्या अध्यायातील ओव्या 'मालकंस' रागात आहेत असे त्यांनी आपल्या 'हरिपाठात' छापले आहे.
'विरहीव प्रभो प्रयामयं परिपश्यामि जगत्' असे म्हणणाऱ्या उपमन्यूप्रमाणे पू.काकांना 'अवघे जग कोंदाटले ज्ञानदेवे' असे वाटत असे. त्यांना सर्वत्र, सर्वकाळी श्री माउलींचीच प्रचिती येत असे. आळंदीचा प्रसाद-बुक्का, पंढरीचा बुक्का कोणी आणला की पू.काकांना प्रेमाचे भरते येई. कपाळभर तो बुक्का लेऊन ते आनंदविभोर होत. घरात चहाची वर्दी जाई व जमलेल्या भक्तजनांत त्याचे प्रेमाने वाटप होई. वर्तमानपत्र घरी येत असत. शेजारच्या खोलीत मुले रेडिओ लावीत असत. पण " जगाच्या जीवी आहे । परी कवणाचा काही नोहे । जगचि होय जाये। तो शुद्धीही नेणे ॥" या न्यायाने तशा परिस्थितीतही पू.काकांचा ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय अविरत, अखंड सुरू असे. सद्गुरुकृपेने असा लोकांतातला एकांत त्यांना पुरेपूर साधलेला होता.
इतकी अद्भुत विद्वत्ता व बहुश्रुतता असतानाही पू.काका त्याचे प्रदर्शन करीत नसत. 'व्युत्पत्ति आघवी विसरिजे ।' या श्री ज्ञानेश वचनाप्रमाणे 'पांडित्यं निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत्' अशा अवस्थेत काका असत. 'जाणीव शहाणिव ओझे सांडूनियां दूरी । आपणी वस्तीकर वर्ततसे संसारी ॥' असे पू.काका वागत.
त्यांचे हे बहुमोल ग्रंथ ते साधकांना विनामूल्य देत असत. त्याने ते वाचावेत एवढीच त्यांची अपेक्षा. हरिपाठ व ज्ञानेश्वरी यांचे नित्यपठण, नामस्मरण व संत सहवास यावर त्यांचा फार भर असे. मला एकदा ते म्हणाले होते, " मास्तर संत सहवासा सारखे दुसरे श्रेष्ठ साधन नाही !" कारण ' सज्जन संगतिरेका भवति भवार्णव तरणे नौका ॥' सत्पुरुषांच्या सहवासाची योग्यता प्रत्यक्ष मोक्षसुखाइतकीच आहे. ' परम पद प्रतिमो हि साधुसङग: ।'
प.पू.काकांना भजन फार प्रिय होते. "म्हणून ' भजन साधन अभ्यास । येणेचि पाविजे परलोकास ॥' असे ते म्हणत. " अनन्य भावाने कोणतेही कार्य करीत रहाणे, एकदा धरलेली वारी किंवा व्रत सहजगत्या जर सारखे चालविले तर तेवढे तप देवाला कळवळा येण्यास पुरेसे होते ", असे पू.काकांनी आपल्या श्रीकृष्णदेव चरित्रात लिहिले आहे. " तुका म्हणे काही नेमावीण । जो जो केला तो तो शीण ॥" अशा रीतीने ज्यांनी काळासही वळसा घालून आपले सत्त्व कायम ठेवले, ज्यांनी सद्गुणाचे मूर्तिमंत स्वरूप स्वतःस म्हणजे जगतास दिले. ज्यांनी चराचराचे ऐक्य स्वतः अनुभवले, ज्यांचे चरण म्हणजे मूर्तिमंत 'श्री' ! " असे पू.काका सद्गुरूंचे वर्णन करतात.
आमच्या पू.गोविंद महाराजांनी घटातला दीप जसा सहज मावळावा त्याप्रमाणे आपला देह फलटण मुक्कामी ठेवला.
पू.काकांनी ज्या दिवशी देह ठेवला तो दिवस मंगळवार होता. सोमवारी रात्री पुण्यातील प्रसिद्ध सिद्धपुरुष श्री शंकर महाराजांचे एक सद्भक्त श्री.अभ्यंकर यांच्या स्वप्नात काका आले व त्यांना म्हणाले, "अरे मी कुठे गेलो नाही व जाणार नाही. मी फलटणलाच राहणार आहे." श्री.अभ्यंकर सकाळी उठल्यावर स्वप्नाबद्दल विचार करू लागले तोच त्यांच्या पत्नीने त्यांना 'तरुण भारत'चा अंक आणून दिला. त्यात पू.काकांनी देह ठेवल्याची बातमी होती. श्री.अभ्यंकर नेहमी पू.काकांच्याकडे येत असत व त्यांनी काकांची सुंदर छायाचित्रे घेतलेली आहेत.
उपनिषदांमध्ये असे सांगितले आहे की, ब्रह्मनिष्ठ पुरुषांचे चैतन्य त्यांचे शरीर सोडून मृत्यूनंतर जात नाही. 'न तस्य प्राणा: उत्क्रामन्ति ॥' तिरुमुलर या तमीळ सिद्धपुरुषांच्या 'तिरु मंत्रम्' या तमीळ ग्रंथात असे म्हटले आहे की, 'ब्रह्मनिष्ठ पुरुषाचे चैतन्य समाधी स्थितीतही कार्य करीत राहते. आगम ग्रंथात असे लिहिले आहे की, 'ब्रह्मनिष्ठ पुरुष देहपातानंतर आपल्या १६ चैतन्य कलांपैकी एक कला आपल्या समाधीत ठेवून देतो. ती कला सर्व शक्तिमान असते व भक्तांना आशीर्वाद प्रदान करीत राहते. पण त्या समाधीचे शुचिर्भूतत्व काळजीपूर्वक जोपासले पाहिजे.' म्हणूनच आजही प.पू.काका फलटणला आहेत व तळमळीच्या साधकांना मार्गदर्शन करीत आहेत असा कित्येकांचा अनुभव आहे.
[ प.पू.काकांनी लिहिलेल्या ' विभूती ' ग्रंथाची लिंक -
https://drive.google.com/file/d/0B-4fTpvl_d6seE1FWE9fNWpDbkU/view?usp=drivesdk
प.पू.काकांचे पूर्वी पोस्ट केलेले संक्षिप्त चरित्र खालील लिंकवरून डाऊनलोड करून वाचावे.४. एक अद्वितीय सिद्धपुरुष

https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wbU1pd1AweW5zUms/view?usp=drivesdk ]
0 comments:
Post a Comment