11 Jun 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २७

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

१५.  साधनेतील विघ्नांचा नाश होण्याकरिता मंत्र

वैकुण्ठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणव: पृथुः ।
हिरण्यगर्भ: शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ॥ ५७॥


वैकुण्ठः - पंचभूतांच्या परस्परविरोधी गती अडवून त्यांना एकमेकांशी जोडणारा.
पुरुषः - शरीरात राहणारा.
प्राणः - प्राणवायुस्वरूप.
प्राणदः - प्राण्यांचे प्राण खंडित करणारा.
प्रणवः  - ज्याला वेदही प्रणाम करतात असा, ॐकाररूपी.
पृथुः - प्रपंचरूपाने विस्तार पावणारा.
हिरण्यगर्भः - ज्याच्यापासून हिरण्यमय अण्डे उत्पन्न झाले, तो.
शत्रुघ्नः - शत्रूंना मारणारा.
व्याप्त: - कारणरूपाने सर्व कार्यांत व्याप्त असणारा.
वायुः  - वायुरूप.
अधोक्षजः  - आपल्या स्वरूपापासून क्षीण न होणारा.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919)


0 comments:

Post a Comment