12 Jun 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २८



श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

१६. पोटाचे विकार दूर होण्याकरिता मंत्र

भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः।
अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसु: ॥२९॥

भ्राजिष्णुः - प्रकाशरूप.
भोजनम् - मायारूपाने आस्वाद घेण्यास योग्य.
भोक्ता - पुरुषरूपाने भोगणारा.
सहिष्णुः - दैत्यांचे बळ सहन करणारा (त्यांचा पराभव करणारा.)
जगदादिजः - जगाच्या आधी हिरण्यगर्भरूपाने स्वतः उत्पन्न होणारा.
अनघः - निष्पाप.
विजयः - ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य इत्यादी गुणांनी विश्वाला जिंकणारा.
जेता - स्वभावतः भूतमात्रांहून वरचढ.
विश्वयोनिः विश्व व त्याचे कारण.
पुनर्वसु: - पुन्हा पुन्हा शरीरात आत्मरूपाने राहणारा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


0 comments:

Post a Comment