6 Jun 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २२

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

१०. सर्वप्रकारचे कल्याण होण्याकरिता मंत्र

अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः ।
श्रीवत्सवक्षाः श्रीवासः श्रीपतिः श्रीमतांवरः ॥७७॥

अनिवर्ती - रणभूमीतून मागे न हटणारा.
निवृत्तात्मा - विषयांपासून स्वभावतः दूर राहणारा.
संक्षेप्ता - प्रलयकाळी सृष्टीला सूक्ष्म करणारा.
क्षेमकृत् - प्राप्त पदार्थाचे रक्षण करणारा.
शिवः - नामस्मरणानेही पवित्र करणारा.
श्रीवत्सवक्षाः - वक्षावरती श्रीवत्स चिन्ह धारण करणारा.
श्रीवासः - ज्याच्या हृदयात लक्ष्मीचे निवासस्थान आहे, असा.
श्रीपतिः - लक्ष्मीचा पती.
श्रीमतांवरः - वेदरूप ऐश्वर्याने युक्त अशा ब्रह्मादी देवांच्यापेक्षा श्रेष्ठ.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


0 comments:

Post a Comment