नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख तिसरा
भगवान श्रीनृसिंह हे अतिशय उग्र दैवत असले तरी भक्तांसाठी मात्र ते अत्यंत प्रेमळ, वत्सल आणि कनवाळूच आहेत. आपल्या भक्तांसाठी ते सदैव सौम्यच आहेत. श्रीनृसिंहलीलेमधील भक्तिमर्म हाच सिद्धांत प्रकर्षाने आपल्यासमोर ठेवते. गेल्यावर्षीच्या "विदारूनि महास्तंभ.." लेखमालेतील आजच्या तिस-या लेखात हाच विचार अधिक स्पष्टपणे मांडलेला आहे. तो सर्वांनी आवर्जून पाहावा.
काल सांगितल्याप्रमाणे, आता आपण भगवान श्रीनृसिंहांच्या उपासनेचा काही भाग बघूया. भगवान श्रीनरहरीरायांना मनोभावे केलेले तुलसीपत्रांचे किंवा सुगंधी पांढ-या पुष्पांचे अर्चन अतिशय आवडते. ते या उपासनेने लवकर प्रसन्न होतात असे पूर्वीच्या महात्म्यांचे सांगणे आहे. ही उपासनाही अत्यंत सोपी आहे, कोणाही स्त्री-पुरुषांना करण्याची मुभा आहे.
श्रीनृसिंहकोशाच्या तृतीय खंडात कोशाचे संपादन प्रमुख आणि श्रीदत्तसंप्रदायातील थोर विभूतिमत्त्व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, "भगवान श्रीनृसिंहांची मूर्ती किंवा चित्र किंवा केवळ "श्रीनृसिंह" असे अष्टगंधाने पिवळ्या वस्त्रावर लिहून किंवा नृसिंहयंत्रावर एक एक नाम घेत तुलसीदल वाहावे. १०८ दले वाहून झाली की दूधसाखरेचा नैवेद्य दाखवून आरती म्हणून साष्टांग नमस्कार घालावा. या अर्चनाने कोठलीही संकटे, आजार, प्रापंचिक दु:खे यांची निवृत्ती होते असा अनुभव आहे. मात्र शुचिर्भूततेचे नियम कटाक्षाने पाळून हे अर्चन करणे आवश्यक आहे."
केवळ भगवान श्रीनृसिंहांची उपासना म्हणून किंवा त्यांच्या प्रसन्नतेसाठी हे अर्चन निष्काम भावनेनेही करता येते आणि तेच अधिक श्रेयस्कर ठरणारे आहे. श्रीनृसिंह नवरात्रात दररोज उपासना म्हणूनही हे अर्चन आपण करू शकतो.
खालील अष्टोत्तरशत नामावलीने हे अर्चन करावे.
श्री नारसिंहाय नम: ।
श्री महासिंहाय नम: ।
श्री दिव्यसिंहाय नम: ।
श्री महाबलाय नम: ।
श्री उग्रसिंहाय नम: ।
श्री महादेवाय नम: ।
श्री स्तम्भजाय नम: ।
श्री उग्रलोचनाय नम: ।
श्री रौद्राय नम: ।
श्री सर्वाद्भुताय नम: ।
श्री श्रीमते नम: ।
श्री योगानन्दाय नम: ।
श्री त्रिविक्रमाय नम: ।
श्री हरये नम: ।
श्री कोलाहलाय नम: ।
श्री चक्रिणे नम: ।
श्री विजयाय नम: ।
श्री जयवर्धनाय नम: ।
श्री पञ्चाननाय नम: ।
श्री परंब्रह्मणे नम: ।
श्री घोराय नम: ।
श्री घोरविक्रमाय नम: ।
श्री ज्वलन्मुखाय नम: ।
श्री ज्वालमालिने नम: ।
श्री महाज्वालाय नम: ।
श्री महाप्रभवे नम: ।
श्री निटिलाक्षाय नम: ।
श्री सहस्राक्षाय नम: ।
श्री दुर्निरीक्ष्याय नम: ।
श्री प्रतापनाय नम: ।
श्री महादंष्ट्रायुधाय नम: ।
श्री प्राज्ञाय नम: ।
श्री चण्डकोपिने नम: ।
श्री सदाशिवाय नम: ।
श्री हिरण्यकशिपुध्वंसिने नम: ।
श्री दैत्यदानवभञ्जनाय नम: ।
श्री गुणभद्राय नम: ।
श्री महाभद्राय नम: ।
श्री बलभद्राय नम: ।
श्री सुभद्रकाय नम: ।
श्री करालाय नम: ।
श्री विकरालाय नम: ।
श्री विकर्त्रे नम: ।
श्री सर्वकर्तृकाय नम: ।
श्री शिंशुमाराय नम: ।
श्री त्रिलोकात्मने नम: ।
श्री ईशाय नम: ।
श्री सर्वेश्वराय नम: ।
श्री विभवे नम: ।
श्री भैरवाडम्बराय नम: ।
श्री दिव्याय नम: ।
श्री अच्युताय नम: ।
श्री कविमाधवाय नम: ।
श्री अधोक्षजाय नम: ।
श्री अक्षराय नम: ।
श्री शर्वाय नम: ।
श्री वनमालिने नम: ।
श्री वरप्रदाय नम: ।
श्री विश्वम्भराय नम: ।
श्री अद्भुताय नम: ।
श्री भव्याय नम: ।
श्री श्रीविष्णवे नम: ।
श्री पुरुषोत्तमाय नम: ।
श्री अमोघास्त्राय नम: ।
श्री नखास्त्राय नम: ।
श्री सूर्यज्योतिषे नम: ।
श्री सुरेश्वराय नम: ।
श्री सहस्रबाहवे नम: ।
श्री सर्वज्ञाय नम: ।
श्री सर्वसिद्धिप्रदायकाय नम: ।
श्री वज्रदंष्ट्राय नम: ।
श्री वज्रनखाय नम: ।
श्री महानन्दाय नम: ।
श्री परन्तपाय नम: ।
श्री सर्वमन्त्रैकरूपाय नम: ।
श्री सर्वमन्त्रविदारणाय नम: ।
श्री सर्वतन्त्रात्मकाय नम: ।
श्री अव्यक्ताय नम: ।
श्री सुव्यक्ताय नम: ।
श्री भक्तवत्सलाय नम: ।
श्री वैशाखशुक्लभूतोत्थाय नम: ।
श्री शरणागतवत्सलाय नम: ।
श्री उदारकीर्तये नम: ।
श्री पुण्यात्मने नम: ।
श्री महात्मने नम: ।
श्री चण्डविक्रमाय नम: ।
श्री वेदत्रयप्रपूज्याय नम: ।
श्री भगवते नम: ।
श्री परमेश्वराय नम: ।
श्री श्रीवत्साङ्काय नम: ।
श्री श्रीनिवासाय नम: ।
श्री जगद्व्यापिने नम: ।
श्री जगन्मयाय नम: ।
श्री जगत्पालाय नम: ।
श्री जगन्नाथाय नम: ।
श्री महाकायाय नम: ।
श्री द्विरूपभृते नम: ।
श्री परमात्मने नम: ।
श्री परंज्योतिषे नम: ।
श्री निर्गुणाय नम: ।
श्री नृकेसरिणे नम: ।
श्री परमत्वाय नम: ।
श्री परंधाम्ने नम: ।
श्री सच्चिदानंदविग्रहाय नम: ।
श्री लक्ष्मीनृसिंहाय नम: ।
श्री सर्वात्मने नम: ।
श्री धीराय नम: ।
श्री प्रल्हादपालकाय नम: ।
भगवान श्रीनरहरीरायांना प्रेमाने व मनापासून त्यांचे नाम घेतलेले अत्यंत आवडते. या अनन्यभक्तीने केलेल्या नामस्मरणाच्या बळावरच तर त्यांनी भक्तश्रेष्ठ प्रल्हादांचे सर्व संकटांमधून संरक्षण केले होते व आजही अनेक भक्तांचे करीत आहेत व पुढेही करीत राहतील. कारण तेच त्यांचे ब्रीद आहे. त्यांच्या या अलौकिक आणि भावमधुर भक्तवात्सल्य ब्रीदाचे मनोहर विवरण सोबतच्या लिंकवरील लेखात केलेले आहे. तोही आवर्जून वाचावा ही विनंती.
भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीनृसिंहराज महाराज की जय ।
( कृपया ही पोस्ट अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवावी ही प्रेमळ विनंती.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख तिसरा
http://rohanupalekar.blogspot.in/2017/05/blog-post_3.html
नृसिंहांची १०८ नामे या अलौकिक विभूतीचे यथार्थ वर्णन करतात, माझे शतशः दंडवत
ReplyDelete