श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - तेरावा
स्वामीकीर्तनी लीन चराचर ।
इंद्र चंद्र सुर सिद्ध महेश्वर ॥१॥
दिक्पती ऋषिगण वंदिती भावे ।
नारद तुंबरू स्तविती स्वभावे॥२॥
स्वामीराजरूप अति मनोहर ।
तळपती वदनी कोटी भास्कर ॥३॥
भक्ता रक्षिती सहज परोपरी ।
नामपाठ कली अमृतलहरी ॥४॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥
अर्थ : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामसंकीर्तनात सारे चराचर मग्न आहे. त्यात इंद्र चंद्रादी देव आहेत, सिद्ध मुनी, ऋषी आहेत. भगवान महेश्वर देखील आहेत. श्री स्वामींना आठही दिशांचे अधिपती, अनेक ऋषी-मुनी मनोभावे वंदन करीत असतात. देवर्षी नारद, तुंबरू हे त्यांचे निरंतर स्तवन करीत असतात.
श्री स्वामीराजांचे रूप अत्यंत मनोहर असून, त्यांच्या मुखावर कोट्यवधी सूर्यांचे तेज विलसत असते. श्री स्वामी समर्थ महाराज इतके कनवाळू आहेत की, ते आपल्या भक्तांचे सर्वबाजूंनी परोपरीने रक्षण करतात. भक्तांनी कळवळून प्रार्थना करण्यापूर्वीच श्री स्वामी महाराज त्यांची अडचण दूर करतात. म्हणून या भयाण कलियुगात केवळ दिव्य असे श्रीस्वामीनामच भक्तांना अमृतमय करणारे आहे, सर्वार्थाने सांभाळणारे आहे !
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.

0 comments:
Post a Comment