श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - दहावा
सुवर्ण झळाळ, दिव्य परिमळ ।
पद्मसुकोमळ, स्वामीकांती ॥१॥
साजे कटीकर, टिळा माळा भार ।
ना भी ऐसा वर, नेत्र देती ॥२॥
मृदु कर्णपातीं, सुहास्ये डुल्लती ।
उदरी आवृत्ती, स्वानंदाची ॥३॥
ब्रह्मांडे अनंत, लीले खेळवत ।
गोटी नाचवीत, स्वामीराज ॥४॥
अमृते हृदयी, मोडी मांडी काही ।
ऐशाकृपे पाही, देवा आता ॥५॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥
अर्थ : सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य-पावन देहाचे, त्यांच्या अलौकिक दर्शनाचे स्वानुभूतिपूर्ण व अतिशय सुरेख वर्णन करताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, राजाधिराज श्री स्वामींची अंगकांती सोन्यासारखी झळाळणारी असून त्यांच्या अंगातून सतत दिव्य सुगंध सर्वत्र दरवळत असतो. त्यांचे सारे शरीर कमळाच्या नाजूक पाकळ्यांसारखे कोमल आहे. त्यांचा डावा हात कंबरेवर शोभून दिसतो. त्यांच्या भव्य कपाळावर केशर-चंदनाचा सुरेख टिळा व गळ्यात रुद्राक्षांच्या व तुळशीच्या माळा अतीव शोभून दिसतात. त्यांचे पाणीदार व प्रेमपूर्ण नेत्र "भिऊ नकोस" असे भक्तांना जणू आश्वासनच देत असतात. ते जेव्हा प्रसन्न होऊन हसू लागतात, तेव्हा त्यांच्या कानांच्या मृदू पाळ्या छान डुलतात, तर त्यांच्या विशाल उदरात जणू स्वानंदाच्या लाटाच उचंबळून येत असतात. ते अनंतकोटी ब्रह्मांडांच्या सर्व घडामोडी बसल्या जागीच आपल्या लीलेने करीत असतात. त्याचे प्रतीक म्हणून ते बोटांमध्ये गोटी नाचवतात. यासाठीच त्यांना 'अनंतकोटीब्रह्मांडनायक' हे बिरुद सर्व संतांनी यथार्थपणे दिलेले आहे.
श्री स्वामीकृपेने धन्य झालेली अमृता श्रीस्वामीचरणीं प्रार्थना करते की, "देवा, माझ्या हृदयातही मोडण्याजोगे (अज्ञान) ते मोडा व मांडण्याजोगे (ज्ञान) ते मांडा. आपल्या चरणीं असलेला माझा भाव आणखी दृढ करा. आपल्याला जे पाहिजे व जसे पाहिजे तसे करा, पण अशीच कृपादृष्टी मात्र माझ्यावर कायम ठेवा !"
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

0 comments:
Post a Comment