श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - सहावा
नाम आवर्तन, स्वामीरूप ध्यान ।
कुंभकाकारण, अनायास ॥१॥
केवल सहज, अनुहत गाज ।
ब्रह्मानंद साज, नादातीत ॥२॥
नामबीज बळ, धाक वाहे काळ ।
समाधी अचळ, उदेजत ॥३॥
नामपाठी गेले, पदी लोभावले ।
स्वामीमय जाले, सर्वभाव ॥४॥
स्वामीनाम खूण, अमृतेचे धन ।
नित्य समाधान, जोडलेसे ॥५॥
श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।
अर्थ : श्री स्वामी समर्थ महाराजांचे दिव्य रूप चित्तात साठवून त्यांच्या नामाचा जप केल्याने आपोआप केवल कुंभक होतो. त्या स्थितीतच अत्यंत दुर्लभ असे अनाहत नादही ऐकू येऊ लागतात. त्याबरोबरच त्या नादाच्याही पलीकडे असणारा ब्रह्मानंद देखील त्या नामधारकाला अनुभवाला येतो. स्वामीनामाचे सामर्थ्य एवढे मोठे आहे की, दुर्लंघ्य काळालाही त्या नाम घेणा-याच्या जवळ जाण्याची भीती वाटते. याच नामजपाने अतिशय दुर्मिळ असणारी निर्विकल्प समाधी देखील सहज लागते. जे भक्त स्वामी नामजप करीत करीत त्यांच्या चरणी खिळून राहतात, ते सर्वभावाने स्वामीमयच होऊन जातात. यासाठीच अमृता आपला स्वानुभव सांगताना म्हणते की, स्वामीनामच माझे श्रेष्ठ धन असून त्या नामामुळेच मला नित्य समाधान प्राप्त झालेले आहे !
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

0 comments:
Post a Comment