श्रीस्वामी समर्थ नामपाठ- अभंग - नववा
नामसमाधीची खूण ।
एक सगुण निर्गुण ॥१॥
अबोलणे प्रेमसुख ।
सामोरले निजमुख ॥२॥
गोडावला घनानंद ।
निराकार गुणकंद ॥३॥
प्रकाशला स्वामीपाठ ।
अमृतेसी आत्मभेट ॥४॥
श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥
अर्थ : हा 'श्रीस्वामीनामपाठ' कसा प्रकट झाला, याचा अद्भुत अनुभव प.पू.श्री.शिरीषदादा कवडे या अभंगातून सांगतात.
श्रीस्वामीनामामुळे लाभणारी समाधी दोन प्रकारची असते. एक सगुण समाधी व दुसरी निर्गुण समाधी होय. सगुण समाधीत स्वामींचे प्रसन्न मुख समोर दिसते तर निर्गुण समाधीत मौनातच त्या प्रेमसुखाचा अनुभव लाभतो. या दोन्ही प्रकारच्या समाधींमुळे तो कृपांकित साधक अंतर्बाह्य गोडावतो, स्वामीमयच होऊन ठाकतो. सर्व सद्गुणांचे बीज असणारा पण कोणताही आकार नसणारा असा हा अलौकिक परमानंद, श्रीस्वामीकृपेने जेव्हा माझ्या अंत:करणात अपरंपार दाटून आला, तेव्हा त्या आनंदातूनच हा नामपाठ प्रकट झालेला आहे, असे प.पू.श्री.दादा सांगतात. म्हणूनच अमृता म्हणते की, राजाधिराज सद्गुरु श्री स्वामींनी कृपावंत होऊन, या नामपाठाच्या रूपाने जणू मला ही आत्मभेटच दिलेली आहे. ( जो नित्यनियमाने व अतीव प्रेमाने, श्री स्वामींच्या प्रसादकृपेने प्रकटलेल्या या सत्तावीस अभंगांच्या नामपाठाचे पठण करेल, त्या नामधारकालाही राजाधिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज करुणापूर्वक अशीच 'आत्मभेट' देतील ! )[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

0 comments:
Post a Comment