दिनरजनी हाचि धंदा गोविंदाचे पवाडे - लेखांक - १
नमस्कार मंडळी,
आजपासून प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या १२९ व्या जन्मोत्सवास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक लीलांचा आपण सप्रेम आस्वाद घेऊया. गेल्या वर्षी पुण्यतिथी महोत्सवात आपण रोज एक अध्याय याप्रमाणे प.पू.काकांचे संपूर्ण चरित्र पाहिलेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा न लिहिता, त्यांच्या चरित्रातील काही अद्भुत अनुभवच या सप्ताहात आपण दररोज पाहणार आहोत. सर्वांचे या 'गोविंदगुण-गायन' सेवेसाठी सहर्ष स्वागत.
( अधिक माहितीसाठी दररोज क्रमाने गेल्या वर्षीच्या एका लेखाची लिंक येथे दिली जाईल, त्यावर जाऊन चरित्राचेही वाचन आपण सहज करू शकता. ज्यांना गेल्यावर्षी पोस्ट केलेले ते संक्षिप्त चरित्र डाऊनलोड करून संग्रही ठेवायचे आहे, त्यांनी कृपया लिंकवरून पीडीएफ डाऊनलोड करावी, ही विनंती.
गोविंद-चरित्र : अध्याय पहिला -
http://rohanupalekar.blogspot.in/2016/09/blog-post_92.html
संपूर्ण चरित्र पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B-4fTpvl_d6seWl1eGJwOEs3Ylk/view?usp=drivesdk
)

***********
१ : अलौकिक त्रिकालदर्शी विभूतिमत्व
कै.गोपाळराव फणसे व श्रीमती अंबूताई हे पू.काकांचे निस्सीम भक्तदांपत्य. यांनी पू.काकांची मोलाची वाङ्मय-सेवा केलेली आहे. आजही ९४ वर्षांच्या अंबूताई निष्ठेने पू.काकांच्या स्मरणात व सेवेत मग्न असतात. त्यांचीच एक हृद्य हकीकत येथे देत आहे.
कै.फणसे म्हैसूरला नोकरीला असताना पू.काकांनी त्यांना स्वत:च्या स्वाक्षरीचे पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, "दोन खोल्या बांधा अन् राहायला लागा. म्हणजे आम्हांला काही करता येईल !" पू.काका सहसा असे कोणाला कधी लिहीत नसत. पण आश्चर्य म्हणजे त्यांच्याच कृपेने, सर्वसामान्य नोकरदार असणा-या कै.फणसे यांची वास्तू पुण्यात टि.म.वि कॉलनीत उभी राहिली. ते १९६६ साली त्या वास्तूत राहायलाही आले.
त्यांनी पू.काकांना विनंती केली की, "आपल्या अमोघ शब्दांचे फळ म्हणून वास्तू उभी राहिलेली आहे, तर आपण एकदा येऊन पायधूळ झाडून ती पावन करावी." पू.काकाही प्रसन्नतेने, "बरं बरं, अवश्य येऊ", असे म्हणाले.
पुढे १९७० साली आपली तब्येत दाखविण्याच्या निमित्ताने, पू.काका, पू.सौ.मामी व त्यांचे चिरंजीव कै.वसंतराव पुण्यात आले होते. त्याचवेळी पू.काकांनी फणश्यांच्या 'संगम' या बंगल्यास भेट दिली. सर्व घर हिंडून, "शॉर्ट बट स्वीट" असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. फणसे दांपत्यास भरून पावल्यासारखे वाटले.
घराच्या मागील बाजूस उभे असताना कै.फणसे पू.काकांना म्हणाले, "काका, ५० फूट पुढपर्यंत आपलीच जागा आहे, तेथपर्यंत चला ना." पण पू.काका म्हणाले, "माझे पाय दुखतात."
तेवढ्यात त्यांना दूरवर एक विहीर दिसली. तिकडे पाहात त्यांनी विचारले, "तिथे कोणी जीव दिलाय का?" फणसे आश्चर्याने म्हणाले, "हो, मी ऐकलंय की एक-दोघांनी त्या विहिरीत जीव दिलाय."
पुन्हा एकदा फणसे म्हणाले, "काका, चला की प्लॉटच्या टोकापर्यंत जाऊन येऊ." पुन्हा पू.काकांनी तेच उत्तर दिले, "नको, पाय दुखतात रे माझे !" ते काही तेथवर गेलेच नाहीत.
पू.काकांच्या या मोजक्याच पण अर्थपूर्ण शब्दांचा उलगडा पुढे बारा वर्षांनी झाला. घरामागची ती ५० फूट जागा फणसे यांनी बिल्डरला ओनरशिप फ्लॅट्स बांधायला दिली. म्हणजे पू.काका उभे होते, तीच फणश्यांच्या घराची सीमा ठरली. पाय दुखतात याचा स्पष्ट अर्थ ती जागा तुझी नाही, हे तेव्हा बारा वर्षे आधी कोणाच्या लक्षात येणार? पण पू.काका तर त्रिकालदर्शी विभूतिमत्व होते ना, त्यांच्यापासून थोडीच काही लपणार होते?
पू.काकांच्या दृष्टीला भूत-भविष्य-वर्तमान सर्व काही एकाच वेळी स्पष्ट दिसत असे. त्यामुळेच भूतकाळात घडून गेलेले त्या विहिरीत कोणी जीव दिल्याचे प्रसंग असोत किंवा भविष्यातील घटना असोत, ते सर्व त्यांना समोर पाहिल्यासारखेच दिसत असे. त्यांच्यापासून काहीच लपून राहात नसे, हेच खरे!
पू.काकांच्या पत्रातील वाक्याचाही खरा खुलासा नंतर झाला. १९८० साली याच वास्तूत प्रसिद्ध चित्रकार व पू.काकांचे भक्त श्री. डी.डी.रेगे यांनी काढलेल्या पू.काकांच्या भव्य तैलचित्राची स्थापना झाली व पुण्यनगरीत पू.काकांच्या भक्तांसाठी त्यांचे एक श्रद्धास्थान निर्माण झाले. या वास्तूत पुढे अनेक संत सत्पुरुषांनी आवर्जून येऊन पू.काकांचे दर्शन घेऊन सेवा केलेली आहे. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांची प्रवचनसेवाही या तैलचित्रासमोर झालेली आहे. त्यांनीही समाधान व्यक्त केले होते हे स्थान पाहून. "दोन खोल्या बांधा, म्हणजे आम्हांला काही करता येईल", या वाक्याचा हाच गूढार्थ होता; जो पुढे जवळपास पंचवीस वर्षांनी सत्य ठरला. संतांचे संकल्पही असे अमोघच असतात !
भगवान सद्गुरु श्री माउली प्रत्यक्ष श्रीभगवंतांच्याच मुखाने अर्जुनाला संतांची महती सांगताना म्हणतात,
मी जैसा अनंतानंद ।
जैसाचि सत्यसंध ।
तैसेचि ते भेद ।
उरेचि ना ॥ज्ञाने.१४.२.५४॥
"अर्जुना, मी जसा अनंत व आनंदस्वरूप आहे, जसा सत्य संकल्प आहे; तसेच माझ्याशी एकरूप झालेले संतही असतात. त्यांच्यात आणि माझ्यात कसलाही भेद उरलेला नसतो !"
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजही, श्रीभगवंतांच्या याच उक्तीनुसार देहीच हरिरूप होऊन ठाकलेले होते. आपले परमभाग्य की आपल्याला त्यांचे स्मरण करण्याचे, त्यांच्या लीला आस्वादण्याचे सौभाग्य लाभते आहे! धन्य धन्य !!
( छायाचित्र : 'संगम' वास्तूसमोर उभ्या असलेल्या ती.अंबूताई व वास्तूतील पू.श्री.काकांचे तैलचित्र)

लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )
0 comments:
Post a Comment