5 May 2018

चोखा चोखट निर्मळ अंतर्बाह्य गंगाजळ



नमस्कार !
आज वैशाख कृष्ण पंचमी, श्रीसंत चोखोबाराय महाराजांची पुण्यतिथी. त्यानिमित्त श्रीचोखोबारायांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत.
संतांचा आणि त्यांच्या प्रेममत्त, भावपूर्ण वाङ्मयाचा अभ्यास हा लौकिक मोजपट्ट्यांनी आणि अननुभूत काल्पनिक निकषांच्या कमकुवत आधारावर कधीच करायचा नसतो. किंबहुना तसा जर अभ्यास केला तर तो अभ्यास न होता केविलवाणा कल्पनाविलासच अधिक ठरतो; आणि ती शब्दांची वायफळ कसरत ' बोलाचीच कढी बोलाचाच भात ' होऊन शेवटी ख-या आनंदाची भूक अतृप्तच राहाते.
श्रीसंत चोखोबारायांच्या बाबतीत अनेक अभ्यासकांची हीच गफलत झालेली दिसून येते. ते हिरिरीने तत्कालीन विषम जातिव्यवस्थेचा चोखोबांना व त्यांच्या कुटुंबाला कसा त्रास झाला, याची त्यांच्या तसे वर्णन असणा-या एखाददुस-या अभंगाचा आधार घेऊन निरर्थक मांडणी करीत बसतात. पण त्या भानगडीत चोखोबांच्या चोख सोन्यासारख्या खणखणीत आत्मानुभूतीचा आस्वाद घ्यायचे, त्यांच्या अद्भुत अंतरंग प्रचिती-प्राजक्ताचा संपन्न फुलोरा पाहायचे, त्याचा तो स्वर्गीय सुगंध आतबाहेर अनुभवायचे साफ विसरूनच जातात. चोखोबारायांची ही जगावेगळी, विलक्षण आत्मप्रचितीच जर पाहायची राहिली तर मग बघितले तरी काय? वेळ वायाच घालवला नाही का? पंचपक्वान्नांचे ताट समोर वाढलेले असताना केवळ ताक पिऊन उठल्यासारखेच आहे हे. पण भगवंतांच्याच प्रेरणेने काही महाभागांच्या नशीबी तेच लिहिलेले असते. आपण मात्र या फालतू भानगडीत न पडता या अमृतपरगुण्याचे, या प्रसादभातुक्याचे भोजन भरपेट जेवावे, हेच बरे नाही का ! .........
( पुढील लेख लिंकवरून वाचावा..)
चोखा चोखट निर्मळ अंतर्बाह्य गंगाजळ -  लेख २०१८

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481



0 comments:

Post a Comment